चांदणी चौक काम वेगात पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश !

0

कोथरूड :

चांदणी चौक एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरु झाले असून या कामाचा आढावा आज केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्यासह आमदार, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, महापालिका अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याच्या बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चांदणी चौक एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे काम वेगात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी नितीन गडकरींनी संबंधित अधिकारी आणि एजन्सीजला दिले आहेत. गडकरींनी प्रकल्पाची पाहणी करत विविध सूचना आणि मार्गदर्शनपर बाबी सांगितल्या. या भेटीने कामास आणखी गती मिळेल आणि लवकरच नागरिकांना वाहतुकीच्या प्रश्नापासून मुक्तता मिळणार आहे.

See also  बोलक्या झाडांची निवीदा रद्द करण्याबाबत मनसे च्या वतीने महापालिका आयुक्त व महापौरांना निवेदन.