बोलक्या झाडांची निवीदा रद्द करण्याबाबत मनसे च्या वतीने महापालिका आयुक्त व महापौरांना निवेदन.

0

पुणे :

कोरोना सारख्या आर्थिक संकटामुळे पुणे महापालीकेच्या उत्पन्नात घट झाली असून महापालीकेची आर्थीक परीस्थीती खालावली आहे. त्यामुळे आपण पुण्यातील अनेक प्रकारची विकासकामे थांबवली आहेत. नुकतेच पालिकेमध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्या गावांमध्ये मुलभूत सुविधा देण्यासाठी म्हणजेच पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनीक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी सदरचे पैसे वापरण्यात यावेत.

तसेच पुण्यातील नागरिकांचे आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनीक वाहतूक व्यवस्था यासारख्या अत्यावश्यक विकासकामांसाठी प्रथम खर्च होणे अपेक्षीत असताना, अश्या कृत्रीम झाडांसाठीच्या या दिखाऊ व कमी महत्वाच्या कामांसाठी ९० लाखांपर्यंतच्या खर्चाचे टेंडर कसे काय निघाले? याचेच आश्चर्य सुजाण नागरीक, स्वयंसेवी संस्था व आमच्या सारख्यांना पडले आहे. तरी आपणास विनंती की महापालीकेच्या वतीने डहाणूकर काॅलनी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये विद्युत विभागाकडून उभारण्यात येणा-या बोलक्या झाडांच्या प्रकल्पाचे टेंडर तातडीने रद्द करून करदात्यांच्या व पुणेकरांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी थांबवावी, असे निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सदर ठिकाणी  प्रकल्प होऊ देणार नाही, याची आपण नोंद घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन आज महापालिका आयुक्त, महापौर व महापालिका सहाय्यक आयुक्त कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, कोथरुड विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, कोथरुड महिला अध्यक्षा सुरेखा होले, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, किशोर इंगवले आदी उपस्थीत होते

See also  गाव समाविष्ट बरोबर सुविधा देणे ही बंधनकारक सुस म्हाळुंगे करांची प्रतिक्रिया....