जर्मनीत औध येथील स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे महान कार्य

0

औंध / जर्मनी :

स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंँध पुणे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.श्रीकांत पाटील यांचा जर्मनी दौरा चालू असून भारतीय संस्कृती रुजावी त्यात वाढ व्हावी जर्मनीत भारतीय संस्कृती विस्तार व्हावा या विचाराने अँड, श्रीकांत पाटील जर्मनीत आहेत.

औध मधील स्वामी समर्थ प्रतिष्ठान या वर्षीपासून २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्त भारतीय संस्कृती प्रचार व प्रसार परदेशात जाऊन केला जात आहे. जर्मनीतील क्रिचहेम येथील ही संस्था पुर्ण परदेशी लोकांची आहे. विठ्ठलधाम संस्थेचे नाव असून परमहंस विश्वानंदजी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कार्य चालते. येथे सुंदर आकर्षक विट्ठलाचे मंदिर आहे.या संस्थेला हिंदू
संस्कृती आणि विचार फार आवडतात व त्याच विचाराने संस्था प्रभावित असून युरोप मधील नावाजलेली संस्था आहे.

या संस्थेत ॲड.श्रीकांत पाटील यांचा भारतीय संस्कृती आणि अध्यात्म ह्या विषयावर व्याख्यान झाले. भारतीय तत्वज्ञान आणि विचार सरणी धर्मग्रंथ आणि ऋषीमुनीच्या दिव्य तपश्चर्येचा अंतरज्ञानाने निर्माण झाली आहे .या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट है आहे कि हिंदु विचार मानवाला ऊत्नती कड़े घेऊन जातात. ही हिंदू संस्कृती सर्व धर्मांचा आदर करते. सर्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करून “जगा आणि जगु द्या” ही संकल्पना मांडते. जगातली सर्वात प्राचीन हिंदू विचार पध्दती आहे. इतर ४८ संस्कृती काळा नुसार लोप पावल्या परंतु हिंदू संस्कृती आजही टिकुन आहे.

याचे कारण मानवाला मिळणारे समाधान आणि आनंद
या विचारातून मिळते हे सिद्ध झाले आहे.आम्ही फक्त हिंदू संस्कृतीत काय चांगले विचार आहेत जे अवलंबण्या सारखे आहेत. याचा प्रचार करत आहोत आम्ही कोणालाही हे नाही सांगत कि आमच्या धर्माचा स्वीकार करा. हिंदू धर्म हा संतांच्या मार्गावर चालणारा आहे.विठ्ठल धाम या संस्थेचे हिन्दु विचार सरणीवर काम ऊत्तम पध्दतीने चालु ठेवले असून जगा पुढे एक आदर्श ठेवला आहे.

See also  टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना देणार पास : नितिन गडकरी