औंध :
पुणे शहरामध्ये गेली दोन दिवस झालेल्या अति मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.असून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील चंद्रमणी संघ औंध रोड,आदर्श नगर बोपोडी,पडळ वस्ती,पाटील इस्टेट शिवाजीनगर या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले असता. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांना धीर दिला.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व पुढील उपाययोजनांसाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सर्व पूर परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सोबत आहे. कोणत्याही प्रकारची अडचण व मदतीसाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ही विनंती.घटनास्थळी पाहणी वेळी विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, स्थानिक शाखाध्यक्ष मयूर बोलाडे, गोकुळ अडागळे, आकाश धेंडे, अंथोनी आढाव, आकाश धोत्रे आदी उपस्थित होते.
औंध रोड येथील चंद्रमणी संघ या वसाहती मध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती,या परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिक मोझेस अडसूळ, राजनंदिनी खंडागळे, अशोक उबाळे या नागरिकांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. या परिस्थितीचा आढावा मनसे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे, जितेंद्र कांबळे, सिद्धांत अडसूळ, समिर शेळके यांनी केला. यावेळी स्थानिक सर्व आढावा घेऊन नागरिकांना मदतीचे आव्हान करण्यात आले.
या वेळी वसहितीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व विद्युत पुरवठ्याबाबत बऱ्याच तक्रार करत होते. महावितरण बोपोडी शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली, व लवकरात लवकर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करण्यात येण्याची मागणी करण्यात आली, व आरोग्य संबंधित उपाययोजना व पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे काम मनसे पदाधिकाऱ्यांनी केली.