मनसेच्या वतीने गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप…

0

औंध :

मनसेच्या वतीने गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप या बोध वाक्यावर आधारित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने ३८ औंध रोड, बोपोडी, व इंदिरा-कस्तुरबा वसाहत आदी परिसरातील इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.

मनसे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी किशोर वाघमारे, विश्वास केदारी, वैशाली चव्हाण, काका गरबडे, निलेश जुनवणे, विशाल पवार, विजय बोरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन औंध रोड शाखाध्यक्ष मयूर बोलाडे,जितेंद्र कांबळे, उपविभाग अध्यक्ष दत्तात्रय रणदिवे, जनाई दत्तात्रय रणदिवे यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोत्रे, सिद्धांत अडसूळ, समीर शेळके, राहुल भोसले, सुशील कापसे, निलेश बोलाडे यांनी केले.

See also  माजी नगरसेवक सनी निम्हण आयोजीत रक्तदान शिबिरात विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान