पुणेकरांचा प्रवास होणार आरामदायी, आता घरबसल्या काढता येणार पीएमपी बसचे तिकीट

0

पुणे :

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. कारण पुणेकरांना आता पीएमपी बसचे तिकीट घरबसल्या ऑनलाईन काढता येणार आहे. पीएमपीच्या ॲपसह खासगी कंपन्यांची सेवा लवकरच पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थाच पीएमपीच्या प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. या प्रवाशांना ॲपवरून तिकीट काढण्याच्या सेवेसोबतच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने सूचवलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाईन तिकीट आणि बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे. याचा फायदा लवकरच पुणेकरांना होणार आहे.

पुणेकर नागरिकांनी घरबसल्या तिकीट काढल्यानंतर प्रवास करताना केवळ वाहकाला क्यूआर कोड दाखवताच तिकीट मिळणार आहे.ॲपवर सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. पीएमपी बसच्या सर्व मार्गाची माहिती देखील यावर प्रवाशांना मिळणार आहे. बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे पास ॲपद्वारे काढण्याची सोय देखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बस डेपोमध्ये जाऊन पास काढण्याचा त्रास कमी होणार आहे. आता त्यांना थेट ऑनलाईनच पास मिळणार आहे.

अंतिम चाचण्या झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये हे ॲप पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. पुणेकरांना या ॲपच्या माध्यमातून ज्या बसने जायचे आहे त्या बसची सर्व माहिती घरबसल्या पाहून त्यांना तिकीट काढता येणार आहे. घरबसल्या तिकीट काढल्यानंतर प्रवास करताना पुणेकरांना फक्त वाहकाला क्यूआर कोड दाखवताच तिकीट मिळणार आहे. अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. पीएमपी बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास ॲपद्वारे ऑनलाइन काढण्याची सोय असणार आहे.

See also  पीएमपीएमएलच्या ठेकेदारांचा अचानक संप प्रवाशांची गैरसोय...