पहिल्यांदाच झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने मारली बाजी..

0

सांगली :

पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली गेली. सांगलीमध्ये पार पडलेल्या या महिला कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली. मुळची सांगलीची असणारी प्रतीक्षा आता पहिली महाराष्ट्र केसही बनली आहे.

अंतिम सामन्यात तिने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट केले. मानेवर एकेरी डाव टाकत प्रतीक्षाने ही लढत जिंकली आणि मानाची गरद नावावर केली.

पहिल्यांदाच आयोजित केल्या गेलेल्या महिला महाराष्ट्र केसही स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 450 कुस्तीगिर महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचे स्वप्न घेऊन सांगलीत दाखल झाल्या होत्या. पण गदेचा मान एकड्या प्रतीक्षालाच मिळाला. मिरज येथील जिल्हा कुस्ती संकुल याठिकाणी या स्पर्धा पार पडला. गुरुवारी (23 मार्च) हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रविरा (24 मार्च) स्पर्धेची अंतिम लढत पार पडली.

https://twitter.com/StateMswa/status/1639267807492812801?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1639267807492812801%7Ctwgr%5E54035650de1d35b1903a7ea2b2df1857ec89bb47%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  सातारा ते कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामांना वेग !