सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांना ‘सम्यक पुरस्कार’देऊन करण्यात आले सन्मानित.

0

पुणे :

फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान, मातंग युवा परिषद आणि सम्यक पुरस्कार वितरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सम्यक पुरस्कार वितरण सोहळा” गणेश कला क्रिडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी औंध येथील सामाजिक कार्यकर्ते सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आणि एक यशस्वी उद्योजक अविनाश कांबळे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते वसंत साळवे यांच्या हस्ते ‘सम्यक पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराची माहिती देताना उद्योजक / सुखाई प्रतिष्ठान अध्यक्ष अविनाश कांबळे म्हणाले की,”सम्यक पुरस्कार” स्विकारण्याचा मान मिळाला हि माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी एक यशस्वी उद्योजक आणि नेहेमी आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याकरिता मला हा पुरस्कार देण्यात आला. समाजाने अशा पद्धतीने घेतलेली दखल आणखी जास्त काम करण्याची प्रेरणा देते. आयोजकांचे मनापासून आभार मानत आहे.

यावेळी भिमा तुझ्या जन्मामुळे हे महानाट्य आणि सम्यक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

See also  औंध येथे चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या  गुन्हे शाखेने  मुसक्या आवळल्या