गुटख्याचे मोठे रॅकेट थेट गुजरात पर्यंत.

0

पुणे :

मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी शहरातून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या गुटख्याचे कनेक्शन थेट गुजरात पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात गोवा गुटखाचे मालक आणि गुटखाकिंग जे.एम.जोशी यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

शहरातील गुटखा रॅकेटवर छापामारी सुरु करताना पोलीसांनी सुरुवातीला चंदननगर हद्दीत 17 नोव्हेंबर रोजी सुरेश अग्रवाल, अक्षय अग्रवाल, आकाश अग्रवाल, प्रविण वाहुळ, निरज सिंगल यांचेवर गुन्हा दाखल करुन सात लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आणि वाहने जप्त केली. या गुन्हयाचा तपास युनिट चारचे पथकाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल करत असताना, तपासात प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर, चौकशी दरम्यान अवैध गुटख्याचे उत्पादन व वितरण हे वापी (गुजरात) व सिल्वहासा (दादर नगरहवेली) येथे अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाली. तेथून माल घेऊन त्याचा मोठया प्रमाणावर पुरवठा चोरटया मार्गाने अटक आरोपींच्या मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शितल शिंदे यांच्या पथकाने वापी आणि सिल्वहासाला छापे टाकले.

 

See also  अमेरिकेत जो बायडेन पर्वाला सुरुवात...