राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिला व पुरूष कबड्डी संघाचे नेतृत्व पुण्याच्या स्नेहल शिंदे व नगरच्या शंकर गदई कडे..

0

पुणे :

राष्ट्रीय खेळ स्पर्धेत यंदा कबड्डीचाही समावेश करण्यात आला असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या ८ राज्यांचे कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होतील.

महाराष्ट्र महिला व पुरूष कबड्डी संघाचे शिबीर नुकतेच संपन्न झाले त्यामधून पुरूष व महिला असे दोन्ही संघ निवडले असून पुण्याच्या स्नेहल शिंदे कडे महिला संघाचे तर नगर च्या शंकर गदई कडे पुरूष संघाचे नेतृत्व करणार आहे.

सात वर्षांनी राष्ट्रीय खेळ स्पर्धा पुन्हा खेळवल्या जाणार आहेत. ७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत गुजरातमधील सहा शहरांमध्ये नॅशनल गेम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचा पुरुष कबड्डी संघ –
अस्लम इनामदार, आकाश शिंदे, सिद्धेश पिंगळे, राहुल खाटीक, शंकर गदई, अक्रम शेख, किरण मगर, अक्षय भोईर, मयूर कदम, पंकज मोहीते, अजिंक्य पवार, सचिन पाटील
प्रशिक्षक – प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक – अयुब पठाण

महाराष्ट्राचा महिला कबड्डी संघ –
स्नेहल शिंदे (कर्णधार), सोनाली शिंगटे, सायली केरिपाळे, सोनाली हेलवी, रक्षा नारकर, रेखा सावंत, पुजा यादव, मेघा कदम, अंकिता काळे, सायली जाधव, पुजा शेलार, निकीता लांगोटे
प्रशिक्षक – संजय मोकल, व्यवस्थापक – मेघाली कोरगावकर

See also  राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने मिळवली २२ सुवर्ण पदकासह एकूण ६१ पदके