नव्या कोरोनाची दहशत असतानाच भारतात ब्रिटनहून आणखी प्रवासी दाखल.

0

नवी दिल्ली :

भारतात कोरोनाच्या बाबतीत एकिकडे दिलासादायक तर दुसरीकडे चिंताजनक परिस्थिती आहे. नव्या कोरोनाची दहशत असतानाच आता भारतात ब्रिटनहून आणखी प्रवासी दाखल झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह आणि नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना नव्या कोरोनाचा आकडा वाढतो आहे. देशात नव्या स्ट्रेनच्या कोरोना रुग्णांची 80 पार गेली आहे.

यूकेमध्ये नवा कोरोना आढळल्यानंतर 23 डिसेंबरपासून भारतात ब्रिटनहून येणारी विमान वाहतूक रोखली होती. मात्र त्याआधी भारतात यूकेहून परतलेल्या नागरिकांची तपासणी केली जात होती. त्यामध्ये नव्या स्ट्रेनचे एकूण 82 रुग्ण आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढतो आहे. त्यात आता भारतानं बुधवारी ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा सुरू केली. यूकेहून 246 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे.

प्रत्येक आठड्याला भारतातून 15 आणि ब्रिटनहून 15 अशा  30 विमानांचं उड्डाण होणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. दरम्यान दिल्ली सरकारनं नव्या कोरोनाला आळा घालण्यासाठी काही पावलं उचचली आहेत. यूकेहून जे लोक येतील आणि ज्यांनी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना आयोसेलेसनमध्ये ठेवलं जाईल. तर ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांना 7 दिवस क्वारंटाइन आणि त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाइन केलं जाईल.

See also  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नव्याने नोंदणी करणे थांबवण्याचे आदेश.