पुण्याचा पालकमंत्री किंवा खासदार होणार नाही : देवेंद्र फडणवीस

0

पुणे :

पुण्याचे पालकमंत्री फडणवीस होणार का? तसंच ते लोकसभा लढविणार का?, याबद्दलच्या चर्चांना आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. ना पुण्याचं पालकमंत्रीपद ना लोकसभा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांत सुरू असलेल्या पतंगबाजीचा फडणवीस यांनी समाचार घेतला. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रीया दिली त्यावेळी ते बोलत होते. या शिवाय पुण्यात दोन महापालिका करण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही हेही त्यांनी स्पष्ट करताना वादाचे विषय आणू नका, असे पत्रकारांना सांगितले.

राज्यात सत्तांतर झाल्यावर माध्यमात ते पुण्याचे पालकमंत्री होतील म्हणून चर्चा सुरू होत्या त्यावर आज स्पष्टपणे त्यांनी मी पालकमंत्री होणार नाही असे सांगितले. तसेच आपण आगामी लोकसभेची निवडणूक देखील पुण्यातून लढवणार नाही असेही ते म्हणाले. उलट मी राज्यात नकोय का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही हे देखील त्यांनी सांगितले. त्यांच्याशी अशी कुठलीही भेट झाली नाही., असे ते म्हणाले.

“पुण्यात पीएमपीएल 150 इलेक्ट्रीक इ मोबिलीटीच्या बसेस आणि चार्जींग स्टेशनचं उद्घाटन आज केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, मुख्यमंत्री उद्घाटनाला होते , पुणे हे पहिलं शहर झालं पाहिजे जेथे शंभर टक्के अपारंपारिक स्त्रोतातून मोबिलीटी करता आली पाहिजे. 650 बसेस झाल्यानंतर पुणे देशामध्ये आग्रणीय होणार आहे, असे देखील फडणवीस म्हणालेत. पुणे शहराचं विभाजन करून नवीन महापालिका झाली पाहिजे का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, नवीन वादाचे विषय कशाला काढता? जेव्हा करायचं तेव्हा पाहू.” राज्य सरकारसमोर असा प्रस्ताव नाही.असे ते म्हणाले.

See also  अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार.