अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार.

0

पुणे :

महापालिकेच्या २०२२ मधे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अंतिम प्रभाग रचनेची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या १७ मे रोजी ही प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला आहे.

त्यानुसार, आयोगाच्या सूचनेनुसार, अंतिम प्रभाग रचना 11 मे पर्यंत पूर्ण करणे, १२ मे रोजी अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेणे आणि १७ मे रोजी ती महापालिकेच्या संकेतस्थाळावर जाहीर करणे असा हा कार्यक्रम असणार आहे..

ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. परंतू सद्या तरी निवडणुक आयोग जोरदार तयारी करत असुन प्रभाग रचना जाहिर होणार आहे त्यामूळे इच्छुकांची कान टवकारले आहे.

See also  पुणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बोनस जाहीर : महापौर मुरलीधर मोहोळ