राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनवाणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली

0

मुंबई :

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनवाणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली असून २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे.

ही सुनावणी आधी ८ ऑगस्ट रोजी होणार होती. ती पुढे ढकलून १२ ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख दिली होती.

मुख्यमंत्री शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासोबत अन्य सहा याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर एकत्र सुनावणी सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमुळे राज्य मंत्रिमंडळांचा विस्तारही रखडला होता. मात्र, आठ तारखेची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार केला.

१२ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे वाटत असतानाच ही २२ ऑगस्ट रोजी सुनावणीची नवीन तारीख आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी या प्रकरणाचा निकाल लागतो की, घटनापीठ स्थापन होते याबाबत उत्सुकता लागली आहे.

See also  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलाविली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक