अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ ‘विद्यांचल हायस्कूल १४ वी मान्सून पुणे चित्रकला स्पर्धा 2022-23 मोठया उत्साहात संपन्न.

0

बाणेर :

५ ते १० वी च्या विद्यार्थ्यांना चित्रातून व्यक्त होण्याची संधी आज मिळाली. विद्यांचल हायस्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षी चौदावी मान्सून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना रंग, रेषा – आकाराच्या माध्यमातून व्यक्त होण्याची खास संधी मिळाली या कार्यक्रमाला अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अशोक मुरकुटे सर, तसेच संस्थेचे इतर माननीय सदस्य भालचंद्र मुरकुरे सर, श्वेता मुरकुटे मॅडम, योगिता बहिरट मॅडम उपस्थित होत्या तसेच परिक्षक म्हणून भीमसेन सीताराम महागावकर व प्रकाश पवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली

ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत पंधरा हून अधिक शाळांच्या  मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सर्व मुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता चित्राच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिक्षकांनी सर्व चित्रांचे पुनःपुन्हा परिक्षण करून निकाल जाहिर केला

आपल्या कलेतून भावना व्यक्त करण्याचे चित्रकला आहे हे अतिशय चांगले साधन आहे. या चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कागदावरती रेखाटल्या त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे प्रतिपादन यावेळी संस्थेचे चेअरमन अशोक मुरकुटे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मिळाल्या संधीचे सोने करत या स्पर्धेत अतिशय चांगल्या प्रकारचे चित्र तयार केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व सहभागी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षी या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळवण्यासाठी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

स्पर्धेचा निकाल:
गट – अ

प्रथम क्रमांक – रितीका पत्की
अभिनव इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल.

द्वितीय क्रमांक माही चांदनी
पुणे इंटरनॅशनल स्कूल
तृतीय क्रमांक -निमिषा कुंभार
जीके गुरुकुल स्कूल

गट – ब

प्रथम क्रमांक -स्वर्णा थोटा
जीके गुरुकुल स्कूल 
द्वितीय क्रमांक -तनिष्का ढेरे विद्याव्हॅली स्कूल
तृतीय क्रमांक  श्वेता मेथरे
पुणे इंटरनॅशनल स्कूल

See also  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणी प्रमाणे एक पाऊल पुढे टाकता आले तर या स्मारकाचे सार्थक होईल : नाना पाटेकर

गट – क

प्रथम क्रमांक अथर्व घाटगे
ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल
द्वितीय क्रमांक अर्णवी झनवर
डॉ – कलमाडी हायस्कूल
तृतीय क्रमांक   करण देशपांडे 
डॉ. कलमाडी हायस्कूल