औंध रोड -खडकी जंक्शन स्टेशन येथील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे :

औंध रोड -खडकी जंक्शन स्टेशन येथील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी संरक्षण खात्याचा विभाग, पोलीस, महापालिका, कॅन्टोन्मेन्ट बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात समन्वयाची आवश्यकता असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची व्यापक बैठक लवकरच घेणार आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी  शुक्रवारी दिली.

औंध रोड-खडकी जंक्शन स्टेशन येथील वाहतूक कोंडीबद्दल नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या, त्यानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, महापालिका पथविभागाचे श्री.गोजारे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रॅबिन बलेजा तसेच ॲम्युनिशन फॅक्टरीचे अधिकारी यांचे समवेत पाहणी केली. या पाहणीत असे लक्षात आले की, डिफेन्स इस्टेट ऑफिस, खडकी कॅन्टोन्मेंट, ॲम्युनिशन फॅक्टरी, महापालिका आणि राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सर्व विभागांची लवकरच एकत्र बैठक घेण्याचे ठरविले, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

पुणे महापालिका आणि पुणे पोलीस वाहतूक विभाग यांनी एकत्रितपणे अभ्यास करुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा अहवाल १५ दिवसांत द्यावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका हे एकत्रितपणे विचार-विनिमय करुन उड्डाणपुलाचा पर्याय उपयुक्त ठरेल का याचाही आढावा घेणार आहेत. याप्रकारे सर्व खात्यांमध्ये पाठपुरावा करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी नागरिकांना दिले.

या भेटीच्या वेळी प्रकाश ढोरे, सुनिता वाडेकर, आनंद छाजेड, सुनील माने, कार्तिकी हिवरकर, सचिन वाडेकर, अनिल भिसे, सुप्रिम चोंधे, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.

See also  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश याच्यासह पाच जणांवर मोक्का लागू