तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

पंढरपूर :

पंढरपूर देवस्थानचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरु आहे.तिरुपतीच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करणार आहे.पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.एकनाथ शिंदे गटाचा राज्यातील पहिला मेळावा पंढरपूर येथे झाला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,हे मिशन सुरु झाल्यापासून धावपळ सुरू आहे.सुरुवातीच्या तीन रात्री एकही मिनिट झोप लागली नाही. हा मेळावा शिंदे गटाचा नाही तर तो बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. ४० आमदारांचा बंड म्हणजे ऐतिहासिक घटना बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादामुळे मी मुख्यमंत्री झालो आहे.धर्मवीर चित्रपटामध्ये सगळं काही दाखवू शकलो नाही.बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन सर्व आमदार पुढे चालले आहेत.आम्ही कामातून उत्तर देणार आहे.

गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलण्यास तयार आहे.सत्ता पाहिजे म्हणून हे बंड केले नाही.मी टीका करत नाही.कामातून उत्तर देतो.सभागृहात कमी बोललो वेळ पडल्यास सगळं सांगेन आपल्याच माणसाने आमच्यावर अनेक वार केले.महाराष्ट्राच्या पाठीमागे केंद्रसरकार ठामपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

See also  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्याना अटक