कबड्डी दिनानिमित्त श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे रंगणार राज्यस्तरीय व पुणे लीग कबड्डीचे सामने

0

बाणेर :

कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिन म्हणजे कबड्डी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे आणि बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित शुक्रवारपासून (१५ जुलै) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे लिग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी पुरुषांचे १६ संघ आणि महिलांचे १६ संघ निवडण्यात आलेले आहेत. तर पुणे लिग कबड्डी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंचे पुरुषांचे ८ संघ आणि महिलांचे ६ संघ निवडण्यात आलेले आहेत. महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि क्रीडा संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, २३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सर कार्यवाह राजेंद्र आंदेकर, मधुकर नलावडे, कार्याध्यक्ष वासंती बोर्डे – सातव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंझुर्डे, योगिराज टकले, प्रकाश पवार, पीडीसी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, अर्जुन शिंदे, महादेव कोंढरे, सह कार्यवाह दत्तात्रय कळमकर, पुणे लिग कबड्डी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, जगन धनकुडे उपस्थित होते.

See also  अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिर