अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिर

0

बाणेर :

बाणेर,पुणे दिनांक 12:12: 2021 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021रोजी सकाळी 9:00 ते 5:00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.

माऊली फाऊंडेशन व अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला होता. या प्रसंगी माऊली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेश संजय मुरकुटे व अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आपल्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या शिबिरात 175 रक्तदात्यांनी आपले रक्त दान केले.’रक्तदान हेच जीवनदान’ या उक्तीप्रमाणे या रक्तदात्यांमुळे जवळपास 525 लोकांना /रुग्णांना जीवनदान मिळेल, अशी माहिती डॉ. उघाडे सर यांनी उपस्थितांना दिली. ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’ या काव्यपंक्ती प्रमाणे खरोखरच हे पुण्य दान वेळेच्या नंतरही म्हणजे जवळजवळ संध्या.7:00 वाजेपर्यंत चालले. या सर्व रक्तदानाचा साठा आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँक याठिकाणी देण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरास महेंद्र जुनवणे, सुहास दगडे, विशाल शिंदे व प्रवीण शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी माननीय सुनील खताळ (जनसंपर्क अधिकारी) संजय ज्ञानेश्वर मुरकुटे, भालचंद्र मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, प्रमिला मुरकुटे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते अशाप्रकारे हे शिबिर आरोग्यदायी वातावरणात उत्साहाने पार पडले.राज्यातील कोरोना महासाथीचे संकट हाताळण्यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना हायकोर्टाने मात्र कौतुक केले आहे.

See also  नवरात्रीचे 'नऊ दिवस, नऊ नारीशक्ती' उपक्रम : डॉ. सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सूरु.