सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशन तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन अनिकेत सेवा भावी संस्थेस फळ व धान्य वाटप करून साजरा

0

बावधन :

सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशन तर्फे व सुर्यकांत भुंडे आणि सुजाता सूर्यकांत भुंडे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन हा अनिकेत सेवा भावी संस्था, भुगाव या ठिकाणी फळ वाटप व धान्य वाटप करून साजरा करण्यात आला.

याबद्दल माहिती देताना युवा नेते सुर्यकांत भुंडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन म्हणजे आमच्यासाठी महत्वाचा दिवस. म्हणूनच या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत अनिकेत सेवाभावी संस्था जी मतिमंद मुलांची निवासी पुनर्वसन प्रकल्प आहे, येथील मुलांसाठी फळे आणि धान्य वाटप करून त्यांची सेवा करण्याचे काम केले आहे. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच गरजूंना मदतीसाठी धावणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षाचे तत्त्वानुसार सामाजिक सेवा करण्याचे काम आम्ही करतो.

यावेळी विश्वास दगडे, सनी सुतार, सुनील भुंडे, सतीश भुंडे, शशिकांत भुंडे, मंगेश दगडे, महेश दगडे, शिवाजी दळवी, सुजीत भुंडे, चिंतामण साठे, किरण भुंडे, शंकर इंगवले, आशिष दगडे, प्रवीण भुंडे, पांडुरंग दगडे, विशाल दगडे, दिपक भुंडे, अशोक दगडे, किरण दगडे आणि सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर पाषाण लिंक रोड वरील लसीकरण केंद्र नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या प्रयत्नातून सुरू.....