शिवसेना पुणे शहराच्यावतीने काश्मीर पंडितावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध

0

पुणे :

काश्मिर खोऱ्यात पुन्हा काश्मिरी हिंदू पंडितांवर हल्ले होऊन सलग हत्यासत्र सुरू झाले आहे. ज्ञानवापी मशिद, ताजमहालाखालचे शिवलिंग शोधणारे, रस्त्यावर हनुमान चालिसा पठण करून महागाई आणि काश्मीर हत्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करू पाहणारे सर्व नवहिंदुत्ववादी कश्मीरातील हिंदूंच्या हत्या आंधळे बहिरे बनुन पहात आहेत. अशावेळी पंडितांच्या समर्थनासाठी महाराष्ट्रातूनच गर्जना झाली आहे, काश्मिरी पंडितांना महाराष्ट्र आधार देईल, काय हवं ते करेल असा 56 इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून महाराष्ट्र हा आधार या भारताचा आणि हिंदुचा हेच सिद्ध केले काश्मिरी प्रजा तळमळत आहे, आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राने पंडितांच्या आधारासाठी बाहू पसरले आहेत, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची हीच परंपरा आहे ..

महाराष्ट्र सरकारने काश्मीरमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शैक्षणिक सोयीसुविधा निर्माण करून त्यांना सुरक्षितता देण्याचे जाहीर केले आहे, मात्र काश्मिरी पंडीतांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात तेव्हा तेव्हा भाजप बैठकांशिवाय काहीच करत नाही, आता बैठका खुप झाल्या कारवाईची धमक दाखवणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना पुणे शहराच्यावतीने काश्मीर पंडितावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध करून, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.

या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहर संघटीका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, बाळासाहेब मालुसरे, भरत कुंभारकर, आनंद गोयल, किशोर रजपूत, राजेंद्र शिंदे, नंदू घाटे, राजेश मोरे, नंदू येवले, संतोष गोपाळ, उमेश वाघ, मकरंद पेठकर, दिलीप पोमण, नितीन शिंदे, संतोष तोंडे, रुपेश पवार, नितीन रावळेकर, राम थरकुडे, युवराज पारीख, गौरव पापळ, परेश खांडके, रमेश क्षीरसागर, आकाश पहिलवान, अतुल दिघे, संदीप गायकवाड, अर्जुन जानगवळी, बाळासाहेब गरुड, अजय शिंदे, अनंत घरत, राहुल जेकटे, अमर मारटकर, नितीन पवार, राहुल आलमखाने, पराग थोरात, संजय वाल्हेकर, शैलेश मोरे, प्रसाद गिजरे, अनिल माझिरे, बकुळ डाखवे, विकी धोत्रे, मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, आकाश रेनुसे, विलास कथलकर, राजेश वाल्हेकर, छाया भोसले, विद्या होडे, अनिता परदेशी, स्वाती कथलकर, भावना थोरात, करुणा घाडगे, गौरी चव्हाण, संगिता भिलारे, अनुपमा मांगडे, ज्योती पवार उपस्थित होते

See also  पुणे महापालिकेने घेतला ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय