पुणे महापालिकेने घेतला ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय

0

पुणे :

पुणे शहरासाठी ट्रॅफिक जॅम काही नवं नाही.
अगदी चुकलेल्या ब्रीज पासुन सुरु असलेल्या विकासकामांपर्यंत कोणतेही कारण वाहतुक कोंडी होणासाठी पुरेसं ठरतं. पण आता हीच वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिका चक्क महिन्याकाठी दोन लाख रुपये मोजणार आहे. महापालिकेने ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनरसाठी महापालिकेकडून पगार म्हणून तब्बल 2 लाख रुपये मोजले जाणार आहे. या सल्लागाराची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जाणार असून त्याला तब्बल 72 लाखांचा खर्च महापालिका करणार आहे.

विशेष म्हणजे या सल्लागाराला दिले जाणारे वेतन हे महापालिका आयुक्तांच्या वेतनापेक्षाही अधिक असणार आहे. त्यातच महापालिकेत शहराच्या वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र अधिकारी आणि विभाग असतानाही या एका पदासाठी एवढ्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या अट्टाहासाठी असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुण्यामध्ये आपण अनेकदा ट्राफिक जॅम झालेलं पाहायला मिळतं. जास्त ट्राफिक पुणेकर प्रमुख पेठांमध्ये पाहायला मिळतं. अनेकदा लोकांचा वेळ जातो परिणामी कामाला उशिर होतो. त्यामुळे महापालिकेच्या ट्राफिक प्लॅनरच्या साहय्याने तरी ट्राफिकचा प्रश्न सुटतो का याकडे पुणेकरांच लक्ष लागून आहे.

See also  भाजप नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर ?