वंदे भारत ट्रेन पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू…

0

मुंबई :

पुणे रेल्वे प्रवास फक्त 2 तास 30 मिनिटांत करता येणे आता शक्य होणार आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली वंदे भारत ट्रेन पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत केंद्राकडून महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारतात दोन महत्त्वाच्या शहरातील प्रवास वेगवान व्हावा, यासाठी केंद्र सरकारने 2019 साली जलद धावणारी वंदे भारत ट्रेन सेवा सुरू केली. सध्या देशात वाराणसी ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते कटरा आणि हावडा ते रांची या रेल्वेमार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवल्या जातात. येत्या दोन वर्षात संपूर्ण भारतभरात 400 वंदे भारत ट्रेन चालविण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यात मुंबई-पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कार असतात. शिवाय या मार्गावर ही ट्रेन सहजपणे चालवता येणे शक्य आहे.

त्यामुळे या दोन शहरांदरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. शिवाय मुंबई आणि पंजाबदरम्यान एसी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. मुंबई ते पंजाब रेल्वे प्रवासासाठी सध्या 33 तास लागतात. Vande Bharat Train वंदे भारत ट्रेनमुळे हा कालावधी कमी होईल, असेही हा अधिकारी म्हणाला.

See also  खासदार, छत्रपती उदयन राजे यांना मुंबई राज्यव्यापी बैठकीसाठी निमंत्रण...