बाणेर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजीव शेडगे उपाध्यक्ष पदी संजय ताम्हणे यांची निवड

0

बाणेर :

बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाणेर गाव शाखेतील संचालक सदस्यांची २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. राजू कालिदास शेडगे यांची अध्यक्षपदी तर संजय हिरामण ताम्हाणे यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीची माहिती देताना संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, बाणेर नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्वसंमतीने बिनविरोध झाली आहे. संस्थेने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये बांधिलकी जपत अनेक कार्यक्रम देखील राबवले आहेत. संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ एकत्रित विचार चांगले काम करून संस्थेच्या यशामध्ये हातभार लावतील अशी खात्री आहे. संस्थेच्या वतीने राजू कालिदास शेडगे यांची अध्यक्षपदी तर संजय हिरामण ताम्हाणे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याबरोबरच निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करीत आहे.

नागरी पतसंस्थेचे बिनविरोध संचालक मंडळ पुढील प्रमाणे :

१. डॉ. दिलीप बबन मुरकुटे
२. राजू कालिदास शेडगे (अध्यक्ष)
३. संजय हिरामण ताम्हाणे (उपाध्यक्ष)
४. विजय दत्तात्रय विधाते
५. वृषभ राजेंद्र मुरकुटे
६. सागर निवृत्ती भसे
७. यशवंत दत्तात्रय साखरे
८. आकाश अशोक धनकुडे
९. दिलीप तात्याबा शेलार
१०. गणेश दिलीप मुरकुटे
११. राम भागुजी गायकवाड
१२. रूपाली लोकेश सायकर
१३. शितल गणेश भुजबळ
१४. कैलास आनंदराव आटोळे
१५. बाळासाहेब सिताराम भांडे

See also  कडकडीत थंडीतही शिवसैनिक बेमुदत ठिय्या आंदोलनावर ठाम.