कृष्णगंगा सोशल फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ११७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

पाषाण :

कृष्णगंगा सोशल फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पाषाणच्या साई चौकातील आदिशक्ती योग भवन येथे फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि भाजयुमो कोथरुडचे सरचिटणीस रोहन रोहीदास कोकाटे यांनी कोकाटे तालीम ट्रस्ट, कृष्णगंगा फाऊंडेशन आणि भाजयुमो कोथरुडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात केले होते. या वेळी परिसरातील ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिरास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी माहापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट देवून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वापटही करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन चा माध्यमातून रोहन कोकाटे यांनी रक्तदान शिबिर घेवुन सामाजिक कार्य जोपासल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी नगरसेवक किरण दगडे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे, माजी नगरसेवक सनी निम्हण , स्विकृत नगरसेवक शिवम सुतार, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, नितीन कोकाटे, कालीदास कोकाटे, रोहिदास कोकाटे, शरद कोकाटे, संदिप कोकाटे आणि परिसरातील नागरिक आणि युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

See also  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणी प्रमाणे एक पाऊल पुढे टाकता आले तर या स्मारकाचे सार्थक होईल : नाना पाटेकर