सर्वसामान्य नागरिकांसाठी मंत्रालयात दोन वर्षांनी प्रवेश सुरू..

0

मुंबई :

गेल्या दोन वर्षापासून महामारीमुळे सर्वत्र लोकडाऊन होते. त्यावेळी मंत्रालयात देखील सर्वसामान्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र आता बुधवार, १८ मे पासून म्हणजेच आजपासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

सध्या देशात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंधदेखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून मंत्रालायात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवेश दिला जाणार आहे. आजपासून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून पास घेऊन सर्वसामान्यांना मंत्रालायत प्रवेश देण्यात येईल.

१८ मार्च २०२० पासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवेश बंद करण्यात आला होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. महामारीत केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व तातडीच्या बैठकांसाठी आमंत्रित केलेल्या व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश दिला जात होता.

See also  कोविड -19 रुग्णांची बिले 30 ते 60 मिनिटांत मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे विमा कंपन्यांना निर्देश