शिर्डी येथे साई मंदिराचे लाऊडस्पीकर बंद तर अजानसाठी देखील लाऊडस्पीकर बंद..

0

अहमदनगर :

भोंगावाद आणि त्याच बरोबरीने सुप्रीम कोर्टाचे निर्देशामुळे तीन तारखेच्या रात्री पासून साई मंदिराचे लाऊडस्पीकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती झाली.

परंतु यावेळी स्पिकरचा वापर केला गेला नाही. याच बरोबरीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मशिदीत नमाज झाली. परंतु अजानसाठी कोणीही लाऊडस्पीकरचा वापर केला नसल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

शिर्डीत साईबाबांनी साठ वर्षाहून अधिक काळ वास्तव करत सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ‘सबका मालिक एक’चा संदेश त्यांनी दिला. शिर्डीतील पडक्या मशिदीत साईंनी धुनी प्रज्वलीत केली. साईबाबांच्या हयातीत मशिदला द्वारकामाई नावाने संबोधिले जाऊ लागले. आजही द्वारकामाईवर रामनवमीच्या दिवशी भगवा आणि केशरी रंग एकत्र अससेला हिंदू मुस्लिमांच्या एकतेचा ध्वज फडकवला जातो.

साई मंदिरात दररोज सकाळी 10 च्या सुमारास साईच्या समाधी समोर भाविक एकत्र येऊन समाधीवर फुले वाहतात. साई समाधीच्या उत्तरेकडील बाजुने मुस्लीम तर दक्षिणेकडील बाजुने हिंदू ग्रामस्थांनी उभे राहून फुले वाहत प्रार्थना करण्याची परंपरा ही गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासून सुरु आहे. साईच्या मंदिरात आजही सर्वधर्मीय भक्त माथा टेकतात. शिर्डीत द्वारकामाई अर्थात मशिदीवरही लाऊडस्पीकर असून त्यावरुन साई मंदिरात होणाऱ्या चारही आरत्याचे प्रसारण केले जाते. प्रत्यक्षात साईमंदिरात आरत्यांना उपस्थित राहू न शकणारे हजारो भाविक या आरत्याचाच आवाज ऐकत सहभागी होत असतात.

See also  शेतकऱ्यांची थकीत बिल लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेने दिले निवेदन.