सुसगाव यात्रेनिमित्त अतिरिक्त पाणी पुरवठा पालिकेने करावा डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पालिकेला दिले निवेदन

0

बाणेर :

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सुस व महाळुंगे गावान मध्ये पाणीपुरवठ्याची समस्या बिकट आहे. तरी या दोन गावांच्या भैरवनाथ देवस्थानच्या उत्सवा निमित्त हजारो नागरिक गावांमध्ये येतात. सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाकडून या दोन गावांसाठी यात्रेदरम्यान अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी आयुक्त/पाणी पुरवठा अधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.

याबद्दल माहिती देताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी सांगितले की, सुसगाव ची यात्रा २२ व ते २३ एप्रिल दरम्यान आहे. तर महाळुंगे गावची यात्रा देखील लवकरच आहे. तरी सुसगाव यात्रे निमित्त २२ ते २५ तारखेपर्यंत अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच महाळुंगे गावच्या यात्रेनिमित्त १ते ३ मे दरम्यान मुबलक पाणीपुरवठा करावा जेणेकरून या दोन्ही गावांच्या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून यात्रेदरम्यान मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली आहे.

 

See also  पाषाण येथे वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब परिवारातील 50 मुलींना ड्रेस मटेरियल शिलाई खर्चा सहित वाटप.