महागाई विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत “महागाई मुक्त भारत” आंदोलन

0

पुणे :

आज देशातील प्रत्येकाचे जनजीवन हे महागाईने कठीण होत चालल आहे. रोजच्या जेवणाच प्रश्न तयार होताना दिसत आहे. आज प्रत्येकाचे आर्थिक हिशोब हे कोंडमडला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात सातत्याने महागाई वाढत आहे. भाजप हे जनतेशी राजकारण करत आहे. जनतेचं काम करत नाहीये, अशी टिका काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करीत आहे. या महागाई विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अलका टॉकीज चौक येथे काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत “महागाई मुक्त भारत” आंदोलन करण्यात आले. यावेळी महागाईची गुढी उभारून भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
त्यांना शोधून काढले पाहिजे – देशात भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यापासून सातत्याने महागाईमध्ये वाढ होत आहे.आमचं सरकार आणा स्वस्थाई आणू अस जे आश्वासन देण्यात आले होते. त्याचं काय झाले. जे आश्वासन दिले होते ते तर पूर्ण केले नाही पण महागाई वाढवली आहे. गोरगरीब जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार हा भाजपने 2014 पासून सुरू केले आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने देशभर आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे जे नेते एक रुपया जरी महागाईमध्ये वाढ झाली तरी रस्त्यावर यायचे ते आता कुठे लपून बसले आहे. त्यांना शोधून काढले पाहिजे, असे यावेळी थोरात यांनी सांगितले.

See also  पुण्यात नविन रुग्ण संख्या घटली : खबरदारी घेतल्याचा फायदा