पीएमपीने आता प्रदूषण निर्माण करणाऱ्या गाड्या ताफ्यातून काढून टाकण्याचा घेतला निर्णय

0

पुणे :

पीएमपीने आता प्रदूषण निर्माण करणाऱ्या गाड्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहनांची वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

पुणे शहरांत पीएमपीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामध्ये पीएमपीच्या डिझेलवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. डिझेल गाड्यांमुळे शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यामुळे प्रदूषण करणा-या गाड्या काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे. सद्य स्थितीत फक्त 233 बस ज्या डिझेलवर चालत आहेत या सर्व गाड्या हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. त्यामुळे आता नागरिकांच्या नजरेस धूर सोडत धावणारी गाडी पाहायला मिळणार नाही.

पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डिझेलच्या सर्व बस काढून पर्यावरण पूर्वक सार्वजनिक वाहतूक पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सर्व डिझेल बस काढण्यात आल्या आहेत. पीएमपीच्या ताब्यात आता फक्त 233 डिझेलवर धावणाऱ्या बस आहेत.

दरम्यान, पीएमपीने एका डिझेल बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले असून ही बस पाहणीसाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान मान्यता मिळताच पीएमपीच्या डिझेल बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये करण्यात येणार आहे.

See also  पालिकेची शहरातील ३० वाहनतळ एकाच कंपनीला चालविण्यास देण्याच्या घाट !