सुसगाव :
सुसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल सुसगाव च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा समारोप समारंभ हायस्कूल च्या वतीने आयोजित केला होता. शैक्षणिक क्षेत्रातील एका महत्त्वाच्या टप्प्यांमधून विद्यार्थी जात असताना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छारुपी दिशा मिळावी. मान्यवरांच्या शुभेच्छांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून त्यांना परीक्षांमध्ये यश संपादन करण्याकरिता प्रोत्साहित करावे म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समारोप समारंभ आयोजित केला होता.
“सर्व विद्यार्थी मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश संपादन करुन पुढे जाऊन उच्च शिक्षणाच्या माध्यमातुन विविध क्षेत्रात आपला ठसा व ओळख निर्माण करत राष्ट्र हितासाठी हाथभार लावतील अशा आशा व्यक्त करत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.”
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, माजी चेअरमन गणेश सुतार, चेअरमन नामदेव चांदेरे, काळुराम चांदेरे, गोवर्धन बांदल, गुलाब चांदेरे, युवा नेते अनिल ससार, मुख्याध्यापक अतुल विश्वासराव, खिल्लारे मॅडम, आणि विठ्ठल सुतार, शिक्षक वर्ग आणि स्टाप तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी व त्यांचे पालक उपस्थित होते.