पाषाण येथे कृष्णगंगा सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध सोसायट्यांना सॅनिटायझर ची फवारणी…

0
slider_4552

पाषाण :

करोना च्या पार्श्वभूमीवर पाषाण भागातील परिसरात नागरिकांच्या मागणी नुसार कृष्णगंगा सोशल फाऊंडेशनच्या वतीने औषध फवारणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. सद्या करोना संकटामुळे सर्वजण भयभीत आहे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृष्णा गंगा सोशल फाउंडेशन च्या वतीने पुढाकार घेवुन पाषाण सुस रोड सुतारवाडी भागातील विविध सोसायट्यांना सॅनिटायझर ची फवारणी करून देण्याचे काम सुरू आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व ठिकाणी सॅनिटायझर ची फवारणी करणे शक्य नसल्याने एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने कृष्ण गंगा सोशल फाउंडेशन च्या वतीने सोसायट्यांना मोफत सॅनिटायझर करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत साईराम सोसायटी पाषाण, मुक्ता सोसायटी सुतारवाडी, ऑरेंज काउंटी 1 सोसायटी, व्यंकटेश गंगा सोसायटी,ऑरेंज काउंटी 3 वस्ती भाग :- कोकाटे अंबराई, पारिजात काॅलनी सुस रोड भागात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

यावेळी रोहन रोहिदास कोकाटे (अध्यक्ष:- कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन) यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, संस्था नेहमीच सामजिक उपक्रम राबवत असते. ‘सेवा हेच ध्येय’ या ब्रिद उराशी बाळगून संस्थेच्या वतीने सामजिक उपक्रम राबवले जातात. करोना मुळे सर्व जण हैराण असून त्या पासून सुरक्षित राहता यावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेवून संस्था हा उपक्रम राबवत आहे. संस्थेमध्ये सर्व मित्रमंडळी मार्फत नियोजन केले जाते असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

यावेळी संतसेवक मारूती महाराज कोकाटे सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र पाषाणकर, संतोष वेल्हाळ,अविनाश ऊरणकर,रमाकांत शिंदे, अभिजित गायकवाड, देशपांडे सर यांनी उपस्थित राहून संस्थेच्या उपक्रमाची प्रशंसा केली. तर संस्थेच्या वतीने संतोष वेल्हाळ, विनायक कोकाटे, किरण कोकाटे, कुणाल कोकाटे, ऋतिक कोकाटे यांनी फाऊंडेशनचा माध्यमातून सॅनिटायझर फवारणी करून घेतली.

See also  स्वच्छतादूत आणि उद्योजक महिलांचा सन्मान : राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ आणि बालेवाडी वूमन्स क्लबचा उपक्रम