ईडी पेक्षा बिडी ची किंमत जास्त : धनंजय मुंडे

0

उस्मानाबाद :

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

त्यातच पुढील काही दिवसांत राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकाराण आणखी तापले आहे. राज्यातील ईडीच्या कारवाईवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी निशाणा साधला आहे. ‘ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे.’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या गटातील विविध विकास कामांचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी धनजंय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारामध्ये मीच येणार, मीच येणार म्हणारे व ज्यांच्या पक्षाचे 105 आमदार आलेत ते विरोधी पक्षनेते झालेत तर ज्यांचे 60 आमदार आहेत, ते मुख्यमंत्री झालेत. बाकी पक्षाचे मंत्री झालेत. हा चमत्कार फक्त शरद पवार साहेबांमुळेच झाला.

भाजपवर टीका करताना धनंजय मुंडे यांनी ईडीच्या कारवाईवर निशाणा साधला. केंद्रीय यंत्रणेवर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘आजकाल ईडीची किंमत गणेश बीडीपेक्षाही कमी झाली आहे.’ यावेळी संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती काय बालतो यांचे भान राखने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही : शरद पवार
“राज्याचा आणि तरूण पिढीचा विकास करायचा असेल तर सातत्याने पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील जनतेची साथ आणि शक्ती मला मिळाली आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत 52 वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं आहे. चार वेळा मला जनतेने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. जनतेने मला खूप दिलं आहे. अजूनही तुमची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उस्मानाबाद येथे व्यक्त केला.

See also  विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत न दिल्यास आंदोलन : पालकांचा इशारा

https://twitter.com/dhananjay_munde/status/1500493422524006413?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1500493422524006413%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F