ग्रामपंचायतीवर पहिला विजय शिवसेनेचा !

0

धुळे :

लॉकडाउनमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा आता उडाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण, निवडणुकीचा निकाला लागण्याआधीच शिवसेनेनं खातं उघडले आहे. धुळ्यातील जिल्ह्यातील वडदे ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून शिवसेनेनं भगवा फडकावला आहे.

राज्यात 14 हजार 232 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मागणी पुढे येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वडदे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. वडदे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वडदे ग्रामपंचायतीवर बिनविरोध भगवा फडकावला.बिनविरोध निवड करुन शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या 45 वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली.

शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले आणि माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील यांच्यासह वडदे गावातील पांडुरंग चित्ते,दयाराम चित्ते, ज्ञानेश्वर बागुल,निंबा सौंदाणे, संभाजी चित्ते यांच्यासह गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाचे नाव शिंदखेडा तालुक्यात नावलौकिक केले. वडदे येथील गावकऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

See also  पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही : गृहमंत्री