पानशेत पूरग्रस्तांना मिळणार कायमस्वरूपी मालकी हक्काने घरं

0

पुणे :

पानशेत पूरग्रस्तांना त्यांची घरं कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यात यावी अशी अनेक दिवसाची मागणी रखडून होती. त्यासाठी विविध शासकीय स्तरावर पाठपुरावा देखिल करण्यात येत होता.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी 02 मार्च 2022 घेतलेल्या निर्णयामुळे पानशेत पुरग्रस्तांचा, घरांचा प्रश्न कायमचा स्वरूपी मार्गी लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पानशेत पूरग्रस्तांना आता त्यांची घरं कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळणार आहे.

अशी माहिती राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतील (PMC) नगरसेवक सुभाष जगताप आणि अश्विनी कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 1961 ला पानशेत धरण फुटल्यानंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पुण्यात आठ वसाहती तयार केल्या होत्या. त्यात 2095 पूरग्रस्तांसाठी 103 गृहनिर्माण संस्था स्थापन करून पूरग्रस्तांना 99 वर्षाच्या करार पद्धतीने भूखंड देण्यात आले होते.

मात्र, पूरग्रस्तांचे भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काचे नसल्याने पूरग्रस्तांना विकास काम करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यांना बँकेकडून घर बांधकाम करण्यासाठी कर्ज देखील उपलब्ध होत नव्हतं. अशा विविध अडचणींना पानशेत पूरग्रस्त गेल्या काही वर्षापासून तोंड देत होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तसेच पूरग्रस्तांच्या अडचणी त पूर्णपणे सोडविण्यात आल्या असा दावा सुभाष जगताप यांनी केला आहे.

See also  पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल