पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या थकलेल्या वीज बिलाला वीजबिल माफी मिळणार नाही : अजित पवार

0

पुणे :

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजबिलावरून शेतकरी आणि राज्य सरकार यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. यामुळे रोज अनेक ठिकाणी वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

असे असताना आता पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे तब्बल ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामुळे राज्यभरात याची चांगलीच चर्चा होत आहे. राज्य सरकारही या वीज बिलांबाबत विचार करत आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर मोठे विधान केले आहे. यामुळे याची चर्चा रंगली आहे.

पुणे जिल्ह्यातील पथदिव्यांच्या थकलेल्या वीज बिलाच्या व्याजाला सवलत देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. पण ब्रम्हदेव जरी आला तरीही आम्ही वीजबिले माफ करणार नाही. बिले ही भरावीच लागणार आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. यामुळे आता वीजबिलाबाबत राज्य सरकार आपली भूमिका मवाळ करेल असे वाटत असताना मात्र सरकार अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामध्ये ३१८ कोटी मूळ थकबाकी व २०७ कोटी रुपयांचे व्याज आहे. या व्याजाला सवलत देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.

यामध्ये बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले होते. यानंतर अजित पवारांनी हे विधान केले आहे. शेती पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी मागील महिन्यात महावितरणने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला होता. पण विरोधानंतर मार्च महिन्यापर्यंत वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. मात्र याकाळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे यावर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जात होती.

दरम्यान, अजित पवारांनी सुपेच्या विमानतळावरही भाष्य केले आहे. सुपे परीसरातदेखील मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहे. विमानतळाबाबत कोणतीही चर्चा सुरु असली तरी पुणे जिल्ह्याला मिळणारे विमानतळ हे सुपे परीसरातच असेल, असे अजित पवारांनी म्हटले आहे. यामुळे आता येथील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार : दिलीप वळसे पाटील