बहुचर्चित मुळा – मुठा नदी सुधार योजनेच्या कामांना लवकरच सुरुवात होणार : महापौर मुरलीधर मोहोळ

0

बहुचर्चित मुळा – मुठा नदी सुधार योजनेच्या कामांना लवकरच सुरुवात होणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे :

जायका कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुळा – मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना मान्यता देण्यास जायका कंपनीने तसेच केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.

त्यामुळे लवकरच नदी सुधार योजनेच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे मान्यतेस येऊन लवकरच कामांचा शुभारंभ होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय जपानी इंटरनॅशनल को – ऑपरेशन एजन्सी ) व पुणे महानगरपालिकेसोबत करार केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या 990.26 कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा 85 टक्के म्हणजे 841.72 कोटी, महापालिकेचा 15 टक्के म्हणजे 148.54 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.

या प्रकल्पामध्ये 3 पॅकेजेस मुख्य मलवाहिन्या टाकणे व 6 पॅकेजेसमध्ये 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे याचां समावेश असणार आहे. पॅकेज एक अंतर्गत करण्यात येणारे मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या पॅकेज चारच्या निविदा या जास्त दर असल्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

प्रकल्पाची पुनर्नरचना करण्यासाठी पुणे महापालिकेने ऑगस्ट 2020 मध्ये जायका कंपनीला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला जायका कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार नविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधणे व मलवाहिन्या टाकणे या कामाचा समावेश करण्यात आला होता. तसेच मैलापाणी शुद्धीकरण केंद्र देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला होता.

या प्रकल्पाच्या कामासाठी 6 निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या निविदांची सल्लागार यांच्यामार्फत छाननी करण्यात आली. त्याचा अहवाल जायका कंपनीला मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. सल्लागार यांनी तीन निविदा पात्र ठरवल्या होत्या. त्यानुसार एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्युशन या प्रकल्पाच्या कामासाठी 6 निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या निविदांची सल्लागार यांच्यामार्फत छाननी करण्यात आली.

See also  उरवडे दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल