शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीर उत्साहात पार…!

0

बाणेर :

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बाणेर, सुस, म्हाळुंगे परिसरातील खास महिला भगिनींसाठी व मुलींसाठी स्वसरंक्षण प्रशिक्षण शिबिर रविवार दिनांक २०/०२/२०२२ रोजी बाणेर येथे शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे (पाटील) संस्थापक बाणेर नागरी सहकारी पतसंस्था व सचिव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर आणि ॲड. लीना मुरकुटे/तापकीर यांच्या वतीने आयोजित केले होते.

यावेळी कार्यक्रमाची माहिती देताना ॲड. लीना मुरकुटे/तापकीर यांनी सांगितले की, या परिसरातील महिला आणि मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम करण्या करिता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महिलांनी स्वतःचे रक्षण करण्याकरिता विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. महिला आणि मुलींना भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाली तरी त्यांना खंबीरपणे स्वतःचे रक्षण करण्या करता उभे राहता आले पाहिजे. भविष्यात या स्वसरंक्षण शिबिराचा महिला आणि मुलींना उपयोग होईल निश्चितच अशी अपेक्षा आहे.

या वेळी डॉ. दिलीप मुरकुटे(पाटील), ॲड. लीना मुरकुटे/तापकीर (पाटील), पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, राम गायकवाड, अतुल अवचट, सुनील जाधव, शशिकांत दर्शने, नंदा शिंदे, कमल दर्शने, जयश्री मुरकुटे, दिपक पाटील, संगीता मुरकुटे, ए. पी. बचुवार, नीलम लोंढे, सुरेखा गरड, फातिमा शेख, श्वेता वाघ, सोनाली भोसले, मोनिका विश्वास, अनिता सायकर, ऐश्वर्या गावडे, अवंतिका गावडे, संतोष भोसले, मेहबूब शेख, राहुल शिंदे, कुणाल गावडे, रितेश रितेश ओव्हाळ आणि परिसराती महिला आणि मुली मोठया संख्येने उपस्थित होत्या.

See also  बालेवाडी रेसिडेन्सी को-ऑपेराटीव्ह हौसिंग वेल्फर फेडेरेशनच्या वतीने कोवीड लसीकरण मोहीम सुरू...