बाणेर येथून चार वर्षीय मुलाचे अपहरण

0

बाणेर :

बाणेर येथून चार वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना आज सकाळी हाय स्ट्रीटवर राम इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाशेजारी घडली.स्वर्णव सतीश चव्हाण (४ वर्षे) असे या अपहृत बालकाचे नाव असून डे केअर सेंटरला (पाळणाघर) जाताना अज्ञात व्यक्तीने सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्याचे अपहरण केले. त्याला घेऊन जाणा-या मुलाच्या हातातून झटका देत दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारक अज्ञात व्यक्तीने स्वर्णवचे अपहरण केले.विशेष म्हणजे बालेवाडी पोलिस चौकीच्या समोर हि घटना घडल्याने घटनेचे गांभीर्य वाढले असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत अधिक तपास चतु:शृंगी पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असून बालेवाडी चौकीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी सुचना केल्या आहेत.

See also  श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर यांच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द