श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर यांच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

0

बाणेर :

श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर यांची आज विश्वस्त मंडळाची सभा पार पडली. सदर सभेत ट्रस्टच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बाणेर येथील सर्व्हे नं. 99 येथे प्रस्तावित छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पाच लाख रुपयांचा धनादेश बाणेर येथील स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद सायकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या स्मारकासाठी लागणाऱ्या वाढीव निधीसाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त हे स्वतः प्रयत्नशील आहेत असे यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले.

तसेच घराशेजारील लागलेल्या आगीत दोन मायलेकींना वाचवताना येथील ग्रामस्थ मारुती रमेश बनकर हे गंभीररीत्या भाजले, त्यांना उपचारासाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत यावेळी करण्यात आली.

कोरोना विषाणू व इतर कारणांमुळे गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थांचे निधन मागील दोन महिन्यांच्या काळात झाले आणि अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. निधन झालेल्या आत्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी सर्वांनी अर्पित केली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, सचिव डॉ. दिलीप मुरकुटे, खजिनदार लक्ष्मण सायकर, हिशोब तपासनीस सागर ताम्हाणे, विश्वस्त गणेश कळमकर, शितल भुजबळ, सुनीता धनकुडे, सल्लागार बबनराव चाकणकर आणि मंगेश मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  ज्येष्ठ नागरिकांनमुळेच प्रत्येकाच्या जीवनाला एक प्रेरणा व ऊर्जा मिळते - बाबुराव चांदेरे