“स्वारद फाऊंडेशन” तर्फे गरजू लोकांना अन्न मिळावे या हेतूने ‘एक घास आपुलकीचा’ हा उपक्रम : स्वाती मोहोळ

0
slider_4552

धनकवडी :
कोरोना च्या दुसऱ्या लाटे मध्ये अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. गोरगरिबांना काम मिळत नाही. त्यामुळे दोन वेळचे जेवण मिळणे फार मुश्किल होवून बसले आहे. अशा परिस्थितीत या कष्टकरी व गोरगरीब समाजास कोणी तरी आपुलकीने मदत करण्याची गरज असते. आणि त्याच गोष्टीचा विचार करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून “स्वारद फाऊंडेशन” तर्फे अशा गरजू लोकांना अन्न मिळावे या हेतूने ‘एक घास आपुलकीचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

एक घास आपुलकीचा या उपक्रमांतर्गत गुरुवार दिनांक ३ जून २०२१ रोजी श्री शंकर महाराज मंदिर, धनकवडी, बालाजी नगर परिसरात गरजूंना अन्नाचे वाटप केले गेले.
स्वारद फाऊंडेशन च्या संस्थापिका स्वाती शरद मोहोळ यांच्या हस्ते हा अन्नदानाचा सोहळा पार पडला. या वेळी स्वारद फाऊंडेशन चे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना स्वारद फाऊंडेशन च्या संस्थापिका स्वाती शरद मोहोळ यांनी सांगितले की, गरजवंताला अशा कठीण परिस्थिती मध्ये अन्नदान करून त्यांना आपुलकीने आधार देण्याचा प्रयत्न स्वारद फाऊंडेशन च्या माध्यमातून केला जात आहे. असे वेगवेगळे उपक्रम राबवत समाज उपयोगी काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून फाऊंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः मैदानात