ब्युटी सलून आणि जिम 50% क्षमतेने चालू ठेवायला राज्य सरकारची परवानगी

0

मुंबई :

जिमला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने जिम सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे 8 जानेवारी ला सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहे.

निर्बंध लागू करत असताना जिम आणि ब्युटी सलून पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र 9 जानेवारी रोजी सरकारने सुधारित आदेश काढत ब्युटी सलून आणि जिम चालू ठेवायला परवानगी दिली आहे

आदेशानुसार जिम 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिमला जाताना दोन्ही लसीची डोस आवश्यक असणार आहेत.

तसेच जिममध्ये काम करणारे कर्मचारी यांचे देखील लसीकरण पूर्ण झालेले असायला हवं, असं आदेशात म्हटले आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना मास्क घालणं देखील बंधनकारक असणार आहे.

See also  राज्यात सरसकट शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु