नवले ब्रीज जवळ पुन्हा अपघात, तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू.

0

पुणे :

नवले पुलावर होणारी अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजुन देखील दिसत नाहीत. आज मंगळवारी सकाळी परत एकदा अपघात झाला असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले होते. त्यानंतर उतारावरून कंटेनर मागे आला असल्याने मागून येत असणाऱ्या तीन ते चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे

या अपघातामुळे सिंहगड रोडवर पूर्णपणे ट्राफीक जाम झाले होते. घटनेची दखल घेण्यासाठी सिंहगड पोलीस स्टेशनचे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार हे घटनास्थळी पोहोचले. मृतांची नावे अद्यापही काळली नसून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले अनेक दिवसांपासून नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. परंतु प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामूळे अशा अपघातांना जबाबदार कोण, याचे मात्र उत्तर गुलदस्त्यातच आहे.

See also  ऑडिओ क्लिप माझी नाही, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही : सुनील कांबळे