नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या विकास निधीतून तयार झालेल्या कै.बाळकृष्ण गुलाबराव तापकीर उद्यानाचे उद्घाटन संपन्न.

0

बाणेर :

बाणेर येथे नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या विकास निधीतून कै.बाळकृष्ण गुलाबराव तापकीर ह्या उद्यानाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रास्ताविक करताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, विकासाने परिपुर्ण बाणेर च्या हायवे जवळील पश्चिम भागात सोयी सुविधांची कमतरता होती. याची खंत नागरिक व्यक्त करत होते. हि खंत दूर करण्याचा उद्देश समोर ठेवून या भागामध्ये सर्व नागरिकांना विचारात घेऊन नागरिकांना हव्या असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुनच त्यांना हक्काचे उद्यान ऊपलब्ध करुण दिले आहे. अशीच विविध विकास कामे भविष्यातही सुरूच राहतील.

यावेळी बोलताना नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, नागरीकांना हवे असणारे सर्व सोयी सुविधा आणि संपन्न असे उद्यान नागरिकांना विचारात घेऊन तयार केलेले आहे. नागरिकांना उद्यानात हवे असणारा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला गेला आहे. निश्चितच मोठ्या आनंदात आणि उत्साहात नागरिक ह्या उद्यानाचा वापर करतील अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, नगरसेविका ज्योती कळमकर यांनी आपल्या विकास निधीतून सुंदर आणि भव्य उद्यान तयार केले आहे. ते तयार करत असताना योग्य संदर्भ लावत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये झाडे लावण्याचे वाढविण्याचे काम केले अशा कै. बालकृष्ण गुलाबराव तापकीर यांच्या नावाने सुरू झाले आहे. बाणेर प्रभागातील तीनही नगरसेवक एक दूरदृष्टी व व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. या भागात काम करणारे गणेश कळमकर हे केवळ प्रभागा पुरते मर्यादित नसून शहराचे नेते म्हणून उदयास आले आहेत. अशाच प्रकारे नागरिकांच्या हिताची कामे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडून होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, पूनित जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, प्रल्हाद सायकर, सहकार आघाडीचे प्रकाश बालवडकर, युवा नेते लहू बालवडकर, गुलाबराव तापकीर, उमा गाडगीळ, सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, नितीन कोकाटे, शरद भोते, काळूराम गायकवाड, सचिन दळवी, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, शिवम सुतार, रवींद्र गारुडकर, बबनराव चाकणकर, महाजन साहेब, शिंदे काका, मारुती नरके, रमेश बेंद्रू, संतोष तापकीर, प्रकाश तापकीर, दिपक तापकीर, संजय पाडाळे, रवींद्र महाजन, अशोक पिळणकर, प्रदीप रामाणे, सौदागर शिंदे, एस. एन. कुलकर्णी प्रभाग क्रमांक ९ मधील भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

See also  बाणेर बालेवाडी मध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जीवन चाकणकर यांच्या माध्यमातून होणार.जीवन चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.