बालेवाडी वाकडला जोडणाऱ्या रस्त्याचे कामाला स्मार्ट सिटी अंतर्गत सुरुवात : अमोल बालवडकर.

0

बालेवाडी :

बालेवाडी व वाकडला जोडणारा पुल हा २०१७ पुर्वी अर्धवट अवस्थेत होता, गेल्या ५ वर्षांच्या काळात वारंवार या पुलाचे काम पुर्ण करण्याकरीता तरतुद उपलब्ध करुन या पुलाचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. व सदर पुल हा पुर्णपणे वाहतुकीच्या दृष्टीने पुर्ण झालेला आहे. परंतु या पुलापासुन बालेवाडी हाय स्ट्रिटकडे जाणारा रस्ता अस्तित्वात नाही. म्हणुन बालेवाडी हाय स्ट्रीट ते वाकड ब्रिज कडे जाणाऱ्या 30 मीटर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

बालेवाडी परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत स्मार्ट सिटी चे सीईओ संजय कोलते ‌ व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष भेट देत पुलाच्या कामाची पाहणी केली. या रस्त्यामुळे बाणेर मुख्य रस्ता व हिंजवडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

बालेवाडी कडून वाकड कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता 24 मीटर होता. तसेच रस्त्याचे अलायमेंट देखील चुकीची झाली होती. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शहर सुधारणा समिती वरती अध्यक्ष असताना यात बदल करून हा रस्ता कलम 205 अंतर्गत 30 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव मांडून मंजूर केला होता.

या रस्त्याच्या बद्दल माहिती देताना नगरसेवक अमोल बालवडकर सांगितले की, 2015 मध्ये या रस्त्यासाठी आंदोलन केले होते. रस्त्यामधील अडथळे व अडचणी दूर करून हा रस्ता काही महिन्यातच पूर्ण होणार आहे. तसेच या रस्त्यावर आधुनिक फूटपाथ, स्ट्रिट लाईट, सायकल ट्रॅक, स्ट्रॅाम वॅाटर लाईन, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, केबल डक्ट, अंडर ग्राऊंड युटिलिटीस, कॉंक्रीट रस्ता असा विविध सुविधांनी हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. बालेवाडी बाणेर परिसरातील आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वपूर्ण रस्ता होत आहे.

पुढे ते म्हणाले की, या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या निधी मधून हा रस्ता पूर्ण करण्यासाठी मान्यता घेण्यात आली आहे. यामुळे काही महिन्यातच बालेवाडी मधून वाकड मध्ये जाण्यासाठी नागरिकांना नवा पर्याय मिळणार असून बाणेर मुख्य रस्त्यावरील तसेच हिंजवडी कडील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील यामुळे सुटण्यास मदत होणार आहे.

See also  कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन च्या वतीने ४८५ नागरिकांचे लसीकरण.

यावेळी स्मार्ट सिटी संजय कोलते, नगरसेवक अमोल बालवडकर,चीफ इंजिनियर अरुण गोडबोले ,कॉन्ट्रॅक्टर व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.