सात देशाचा सहभाग असलेल्या ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या ‘पॅनएक्स – 21’चे पुण्यात उद्घाटन

0

पुणे :

भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या सात देशाचा सहभाग असलेल्या ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या ‘पॅनएक्स – 21’चे पुण्यात उद्घाटन झाले.

बिमस्टेक राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन बाबींमध्ये सामायिक क्षमता विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 20 ते 22 डिसेंबर असे तीन दिवस हा सराव कार्यक्रम असेल.

लष्करप्रमुख, जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या संदेशात आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व विशद करत, अडचणीच्या काळात एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. या सरावादरम्यान अधिसूचना, तयारी आणि प्रतिसाद यांचे पुनरावलोकन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले.

आजचा परिसंवाद तीन सत्रांमध्ये पार पडला. यामध्ये आपत्‍ती निवारण आणि व्‍यवस्‍थापन क्षेत्रातील नामवंत तज्ञांनी उपस्थितांना संबोधित केले. पहिल्या सत्रात कोरोना मधून मिळालेल्या संकल्पना, मूलभूत गोष्टी यासह महामारीच्या प्रतिसादाशी संबंधित विविध वैद्यकीय पैलूंवर चर्चा करण्यात आली. दुस-या सत्रात महामारीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीला प्रतिसाद देण्याच्या यंत्रणेवर चर्चा करण्यात आली. तिसऱ्या सत्रात प्रादेशिक आपत्तींना देशांतर्गत प्रतिसादात सशस्त्र दलांचे एकत्रीकरण याबाबत माहिती देण्यात आली.

See also  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक सादर