मनसेची आक्रमकता पाहून ॲमेझॉन नमले…

0

मुंबई:

मनसे आणि ॲमेझॉन यांच्यातील मराठी भाषेवरून झालेल्या संघर्षात ॲमेझॉन ला माघार घ्यावी लागली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई आणि पुण्यात ॲमेझॉन कार्यालय तोडफोड करण्याचा सपाटा लावल्यानंतर अ‍ॅमेझॉनने नमते घेतले आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अ‌ॅमेझॉनकडून मनसेला तसे कळवण्यात आले आहे.

मात्र, आता अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे अ‌ॅमेझॉनचे अधिकारी दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावे लागेल.

अ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 5 जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसे कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. महाराष्ट्रातील अमेझॉनचे पहिले कार्यालय असणाऱ्या कोंढवा येथील अमेझॉनच्या ऑफिसवर शुक्रवारी सकाळी मनसैनिकांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर दुपारी मुंबईच्या चांदिवली परिसरातील अमेझॉनच्या गोदामाची स्थानिक कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. मनसे अधिकच आक्रमक झालेले पाहून अखेर ॲमेझॉन नमते घ्यावे लागले आहे.

See also  धनंजय मुंडे प्रकरण वेगळे वळण : महिलेची माघार