महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती

0

मुंबई :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिसूनची (26 नोव्हेंबर) रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.

किशोर राजे निंबाळकर यांची सहा वर्षांसाठी नियुक्ती

मागील अनेक दिवसांपासून एमपीएसी आयोगाचा पूर्ववेळ अध्यक्ष नव्हता. आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यानंतर आता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. निंबाळकर यांचा कार्यकाळ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत.

दरम्यान, याआधी सतीश गवई हे आयोगाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले. त्यांतर नंतर हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आलं. ते निवृत्त झाल्यानंतर आता पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर राजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. सध्या आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य आहेत.

https://twitter.com/mpsc_office/status/1464230262296834048?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1464230262296834048%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर.