पुण्यातील जम्बो कोविड सेंटर मध्ये हाणामारी..

0

पुणे :

पुण्यामधील जंबो कोविड सेंटर आणि वाद विवाद हे समीकरण सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून रुग्णांची हेळसांड, अपुरी व्यवस्था, रुग्ण गायब होणे, कर्मचाऱ्यांची थकीत पगार यामुळे हे कॉल सेंटर चर्चेमध्ये होते. परंतु आज येते तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. जीवाची परवा न करता रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे येथे आंदोलन  झाले होते.

आज सेंटर च्या आवारा मध्ये कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याचे काम सुरू होते. त्यावेळी महिला कर्मचारी आणि महिला बाऊन्सर यांच्यामध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर एकमेकांवर धावून जाणे व हाणामारी याच्यामध्ये झाले. बराच वेळ कर्मचारी व भावसार यांच्यामधील भांडणाचा गोंधळ सुरु होता. कोविड सेंटर मध्येच असे वातावरण निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.

See also  पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार