अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत

0

अहमदनगर :

महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सिताराम दगडु जाधव (वय 83, बख्तपुर ता. शेवगाव), भिवाजी सदाशिव पवार (80, किन्ही ता. पारनेर), रामकिसन विठ्ठल हरपुडे (70, माका, ता. नेवासा), कोंडाबाई मधुकर कदम (70, केडगाव, ता. नगर), छबाबी अहमद सय्यद (65, शेंडी, रा. नगर), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (65, तेलकुडगाव, ता. नेवासा), कडुबाळ गंगाधर खाटीक (65, पाथरवाला, ता. नेवासा), आसराबाई गोविंद नागरे (58, शेवगाव, ता. शेवगाव), दिपक विश्वनाथ (37, आश्वी, ता. संगमनेर) आणि एक 58 वर्षीय अनोळखी व्यक्ती यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अहमदनगर येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, 17 कोरोना रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आगीमुळे येथील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. या कारणामुळे अनेक कोरोना बाधितांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आले. आगीमुळे किती रुग्ण दगावले आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती रुग्ण दगावले याची अचूक आकडेवारी तपासानंतरच समोर येईल.

दरम्यान, अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची चौकशी होईल, अशी माहिती अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान कोल्हापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेत वरून ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

See also  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हरियाणातील पानीपतमध्ये स्थापन करण्यात येणार

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1456910773691641860?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1456910773691641860%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F